नागपूरच्या रेशन दुकानदार संघटनांची फडणविसांकडे धाव Saam Tv
महाराष्ट्र

नागपूरच्या रेशन दुकानदार संघटनांची फडणविसांकडे धाव

तांदूळ घोटाळ्याची सीबीआय चौकशी शक्यता

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात आता अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वारवण्यात येत आहे. या प्रकरणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची नागपूर Nagpur रेशन दुकानदार Ration Shop संघटनेच्या अध्यक्षांनी भेट घेतली. या तांदूळ घोटाळ्याची सीबीआय CBI चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. फडणवीस यांनी या घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्राकडे पाठविले असून येत्या काळात भाजप BJP तांदूळ घोटाळ्याचा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा -

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत तांदूळ घोटाळ्याची मोठी व्याप्ती आहे. याच रेशनवरील तांदूळ घोटाळ्याबाबत नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल Guddu Agrawal यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ‘साम टीव्ही’ने तांदूळ घोटाळ्याची बातमी लावून धरली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा दिला जातोय. तसेच रेशन दुकांनमध्ये येणारा तांदळाचं वजन कमी असते. मोठ्या प्रमाणात तांदूळ बाहेर विकला जातो. हा प्रकार अधिकारी आणि राईस मिल मालकांचे संगनमताने होतो. त्यामुळं चौकशी झाल्यास मोठे मासे यात अडकण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT