NAGPUR PANCHAYAT MEMBER MURDERED OVER MONEY DISPUTE, ACCUSED ARRESTED Saam TV News
महाराष्ट्र

Nagpur Crime: 'पैसे दे नाहीतर..' उधारीच्या पैशातून वाद; ग्रामपंचायत सदस्याला भररस्त्यात संपवलं

Gram Panchayat Member Killed: पैशाच्या वादातून नागपूरच्या पिपळा डाकबंगला येथे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांचा धारदार शस्त्राने खून. आरोपी अटकेत, पोलीस तपास करत आहेत.

Bhagyashree Kamble

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उधारीच्या पैशाच्या वादातून आरोपीने ग्रामपंचायत सदस्याची हत्या केली आहे. रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करत त्यानं हत्या केली आहे. या प्रकरणाची पोलिसांना मिळताच त्यांनी चौकशी करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही वैयक्तिक अथवा राजकीय वाद असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अतुल पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो नागपूर जिल्ह्यातील पिपळा डाकबंगला परिसरातील ग्राम पंचायत सदस्य होता. प्राथमिक माहितीनुसार, मृत अतुल पाटील याने आरोपी हिमांशूकडून काही रोख रक्कम उधार घेतली होती. उधारीचे पैसे त्याने वेळेवर परत केले नव्हते. या उधारीवरून दोघांमध्ये सोमवारी सायंकाळी वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

त्यानंतर धारदार शस्त्राचा वापर करून आरोपी हिमांशू याचे अतुलचा खून केला. यानंतर पसार झाला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणात आणखी काही वैयक्तिक किंवा राजकीय वाद असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तपास करून आरोपी हिमांशूला ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का? हा वाद उधारीच्या पैशांवरून की इतर कारणावरून झाला? याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT