Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Railway Crime: साधेपणाने रेल्वे प्रवाशांमध्ये जावून करायची चोरी; महिला रेल्‍वे पोलिसांच्‍या ताब्‍यात

साधेपणाने रेल्वे प्रवाशांमध्ये जावून करायची चोरी; महिला रेल्‍वे पोलिसांच्‍या ताब्‍यात

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या एका ३५ वर्षीय महिला चोराला अटक करण्यात यश मिळवले आहे. ही महिला अगदी साधेपणाने राहून रेल्वे (Railway) प्रवाशांमध्ये मिसळण्याची आणि संधी साधत चोरी करत होती. (Breaking Marathi News)

सदर महिला चोरा संदर्भातील तक्रारी रेल्वे पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्‍या. यानंतर पोलिसांनी ही कारवाई करत महिलेला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून काढत आणि तिला अटक करण्यात यश मिळवले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या दोन चोऱ्यांचा उलगडा या महिलेकडून झाला असून मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला.

महिलांच्‍या टोळीचा संशय

सदर महिलेसोबत आणखी काही महिलांची टोळी आहे का? याचा सुद्धा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहे. एकंदर म्हणजे रेल्वेमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटना बघता पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आणि ही महिला चोर रेल्वे पोलिसांच्या हाती लागली. हिच्या टोळीचा सुद्धा आता रेल्वे पोलीस शोध घेत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT