Marriage Saam Tv
महाराष्ट्र

वरातीत घोडा नाचवणं अंगलट, नवरदेवाचा पाय मोडला; स्ट्रेचरवर बसून लावलं लग्न

वरातीत घोडा नाचवणं अंगलट, नवरदेवाचा पाय मोडला; स्ट्रेचरवर बसून लावलं लग्न

मंगेश मोहिते

नागपूर : लग्नात नवरदेवाची घोड्यावरून वरात निघाली नाही; तर त्या लग्नाच्या उत्साहात रंगच भरला जात नाही. मात्र, नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे घोड्यावरून लग्नाची वरात काढने एका नवरदेवाला भलतेच महागात पडले आहे. वरातीतच पाय मोडला अन्‌ स्‍ट्रेचरवर बसून लग्‍नसोहळा (Marriage) उरकवावा लागला. ही घटना सावनेर येथे घडली असून नवरदेव घोड्यावरून खाली आदळल्याचा व्हिडीओ वायरल झाला असून समाज माध्यमांवर धुमाकूळ घळतो आहे. (nagpur news wedding the horse danced and man leg was broken)

'भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे' ह्या गाण्यावर वऱ्हाडी मंडळीने बँडच्या तालावर ठेका धरला होता. नवदेवाच्या मित्रांनी (Nagpur News) आणि नातेवाईकांच्या आग्रहास्तव घोडेवाल्याने घोड्याला नाचवणे सुरू केले. घोडा सुद्धा दोन पायावर उभा होता. गाण्यावर नाचत असताना, अचानक तो घोडा संतापला आणि चक्क नवरदेवालाचं जमीनीवर खाली पाडले. ही घटना क्षणात घडली. ज्यामुळे उपस्थित वऱ्हाडीच्या काळजाचा ठोका चूकला होता. या घटनेत नवरदेव पायचे हाड मोडले आहे. उत्साहाच्या भरात वऱ्हाडी मंडळी घोडा नाचवण्याचा आग्रह करता, मात्र घोड़ा मालक लवकर पैसे कमावण्याचा हव्यासापोटी घोड्याला नीट प्रशिक्षण देखील देत नाहीत. ज्यामुळे घोड्याचा तोल जाने, नवरदेव खाली पडण्यासारख्या घटना घडत असल्याचं मत घोडा मालकाने व्यक्त केले आहे.

स्ट्रेचरवर लेटवुनच लग्न सोहळा

नवरदेव घोड्यावर पडल्यामुळे त्याच्या उजव्या मांडीचे हाड फ्रँचर झाले आहे. नवरदेवाला लग्न मंडपात जाण्याऐवजी थेट रुग्णालयात (Hospital) जावे लागले. मात्र, त्यानंतर स्ट्रेचरवर लेटवुनच लग्न सोहळा आटोपता घ्यावा लागला. सर्व विधी पूर्ण करून लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर नवरदेवाला पुढील उपचारासाठी नागपूरला आणण्यात आले आहे. नवरदेव घोड्यासकट खाली आदळल्याचा व्हिडीओ वायरल झाला असून समाज माध्यमांवर धुमाकूळ घळतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Post Office ची धांसू योजना, नवरा-बायकोने एकत्र करा गुंतवणूक; ५ वर्षांत मिळतील १३ लाख रुपये

वर-वधूच्या नातेवाइकांचा धडाकेबाज डान्स! 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती'वर मांडवात रंगला जल्लोष; VIDEO

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

SCROLL FOR NEXT