Nagpur News Bike Robbery Saam tv
महाराष्ट्र

नागपुरातून दुचाकी चोरी, ग्रामीण भागात विक्री; दोन चोरट्यांना अटक

नागपुरातून दुचाकी चोरी, ग्रामीण भागात विक्री; दोन चोरट्यांना अटक

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या वाठोडा पोलिसांनी दोन बाईक चोरांना अटक केली. जे भंडारा जिल्ह्यातून नागपुरात (Nagpur) यायचे या ठिकाणी बाईक चोरायचे आणि ग्रामीण भागात नेऊन दुचाकी विकायचे. अटक केलेल्‍यांकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघड झाले असून (Bike Robbery) सहा बाईक जप्त करण्यात पोलिसांना यश आले. (Tajya Batmya)

वाठोडा पोलीस (Police) स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना त्यांना एकाच नंबरच्या दोन पल्सर बाइक दोन व्यक्ती घेऊन जाताना दिसले. यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता ते भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील असून नागपुरात येऊन ज्या वस्त्यांमध्ये बाईक घराच्या बाहेर राहतात. अशा वस्तींमध्ये जाऊन त्या ठिकाणांवरून बाईक चोरी करायचे.

अन्‌ डाव फसला

चोरीच्‍या बाईक ग्रामीण भागात न्यायच्या आणि कमी पैशांमध्ये त्या विकायच्या. यानंतर पुन्हा आपल्या जिल्ह्यात जाऊन काही दिवस राहायचे. मात्र यावेळी त्यांचा डाव फसला आणि दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत सहा बाईक चोरल्याची कबुली दिली. त्या बाईक सुद्धा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मात्र पोलिसांना या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT