नागपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. ही कार रस्त्यालगच्या रेलिंगमध्ये घुसली. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले आह. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या रेलिंगमध्ये घुसून भीषण अपघात झाला. या अपघातामध्येएकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. रोशन निंबाळकर (२६ वर्षे) असं मृत तरुणाचे नाव आहे. रोशन निंबाळकर हा त्याचा मित्र अभिषेक परमार आणि सय्यद आमिर शहजाद सय्यद साबिर यांच्यासोबत कारमधून प्रवास करत होता.
हे तिघेही कामठीवरून नागपूरकडे येत असताना कामठी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तान समोरील गरुड चौक परिसरात पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. सय्यद अमीर शहजाद सय्यद साबीर हा कार चालवत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्यालगच्या रेलिंगमध्ये घुसली.
हा अपघात होताना कारचा वेग इतका जास्त होता की समोरच्या बाजूने कारमध्ये घुसलेले रेलिंग कारच्या आतमध्ये बसलेल्या रोशन निंबाळकरचा गळा चिरत बाहेर आले. या अपघातामध्ये रोशनचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या इतर दोन तरुणांना उपचारासाठी कमाठी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर मृतक रोशनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.