Nagpur Student End Life Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: नागपूर हादरले! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत आयुष्य संपवलं

Nagpur Student End Life: नागपूरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. राहत्या घरात तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. आत्महत्या करताना तिने बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • नागपूरमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे खळबळ

  • हिंगणा येथील डीएनडी हाइट्समध्ये घटना घडली

  • बॉयफ्रेंडच्या लग्नामुळे मानसिक तणाव असल्याची चर्चा

  • आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल केल्याची माहिती

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत या तरुणीने आयुष्य संपवलं. ही घटना नागपूरच्या हिंगणा परिसरातील डीएनडी हाइट्समध्ये घडली. बॉयफ्रेंडचे दुसऱ्या तरुणीसोबत लग्न झाले त्यामुळे नैराश्येत येत या तरुणीने आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये विद्यार्थिनीने बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल करत आत्महत्या केली. विध्येश्वरी आपटे (वय २३ वर्षे) असं या विद्यार्थिनीचे नाव होते. ती हिंगणा परिसरातील डीएनडी हाइट्समध्ये राहत होती. राहत्या घरातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती मुळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होती. आकार नर्सिंग कॉलेजची अंतिम वर्षात ती शिकत होती. ती मैत्रिणींसोबत डीएनडी हाइट्स या सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होती.

घटनेच्या वेळी मैत्रिणींसोबत ती पदवीदान कार्यक्रमाला न जाता फ्लॅटमध्ये एकटीच होती. आत्महत्येपूर्वी तिने बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल करत टोकाचा निर्णय घेतल्याचे बोललं जातं आहे. दोन दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यामुळे ती मानसिक तणावात असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

Terror Alert : मोठी बातमी! टॉय कारमध्ये IED ठेवून हल्ल्याचा कट; महाराष्ट्र कनेक्शन उघड, ३ राज्यांतून चौघांना बेड्या

High Blood Pressure : BP कंट्रोल करण्यासाठी लाइफस्टाइमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, औषधांची गरजही भासणार नाही

Famous Actor Video : वाढलेले केस अन् हातात सुटकेस; बॉलिवूडचा सुपरस्टार रस्त्यावर भटकतोय, अवस्था पाहून ओळखणंही कठीण

Lung cancer symptoms: 5 अशी लक्षणं दिसतायत तर असू शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT