Nagpur Airport Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Airport News: केनियावरुन आणलेले २४ कोटींचे ड्रग्ज जप्त, नागपूर एअरपोर्टवर कस्टमची मोठी कारवाई

Narcotics Worth Rs 24 Crores Seized: याप्रकरणी दीपक नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एका नायजेरियन व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे.

Priya More

संजय डाफ, नागपूर

Nagpur News: नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) कस्टम विभागाने (Customs Department) मोठी कारवाई केली आहे. तब्बल २४ कोटी किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. केनिया येथून नागपूरमध्ये हे ड्रग्ज आणण्यात येत होते. पण विमातळावरच कस्टमने कारवाई करत हे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी दीपक नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एका नायजेरियन व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नौरोबी केनिया येथून दुबई-नागपूर विमानाने एक व्यक्ती ड्रग्ज घेऊन नागपूरमध्ये येत होती. या व्यक्तीने एका लोखंडी बॉक्समध्ये ड्रग्ज लपवून आणले होते. पण त्याचा नागपूरमध्ये ड्रग्ज आणण्याचा हा प्रयत्न फसला. कारण नागपूर एअरपोर्टरवर उतरताच तपासणी करत असताना या व्यक्तीला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

दीपक नावाच्या या व्यक्तीकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ३.७ किलो एवढ्या वजनाचे ड्रग्ज जप्त केले. अँम्फेटामाइन नावाचे हे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल २४ कोटी रुपये इतकी आहे. या व्यक्तीविरोधात ही कारवाई केल्यानंतर दिल्लीतील एका नायजेरियन व्यक्तीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूरमध्ये ड्रग्ज आणण्याचा हा डाव कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावला. पण हे ड्रग्ज ही व्यक्ती कोणाच्या सांगण्यावरुन घेऊन आली होती आणि कोणाला हे ड्रग्ज विकण्यासाठी आली होती याप्रकरणाचा तपास सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या ड्रग्जचे कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कस्टमचे अधिकारी त्या अँगलने देखील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT