Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : काबाडकष्ट करणाऱ्या महिला घेणार ताज हॉटेलमधील चहाचा स्वाद; २० कष्टकरी महिलांना जीवाची मुंबईची सफर

Nagpur : रेल्वेतही प्रवास न करणाऱ्या महिलांना चक्क जीवाची मुंबई करण्याची संधी लाभली आहे. हे सगळं स्वप्नवत वाटणाऱ्या महिलांना रसिका आश्रम आणि जीवाची मुंबई टीमने वास्तवात करून दाखवल आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: आयुष्यभर काबाडकष्ट करत असलेल्या घरगुती काम करणाऱ्या महिला कामगाराच्या आयुष्यात संघर्ष तसा पाचवीला पूजलेलाच असतो. या कामातून कधी कुठे जाणे नाही कि कुठे फिरणे नाही. सतत काम करत आयुष्याचे गाडे हाकायचे. यात गावापासून दूर असलेल्या मुंबईमध्ये कधी जाणार आणि जीवाची मुंबई कधी पाहणार हे स्वप्नवत होते. मात्र काबाडकष्ट करणाऱ्या या महिलांना जीवाची मुंबईची सफर करून डोळ्यात आनंद साठविला आहे.  

'जीवाची मुंबई -श्रमाची आनंदवारी' या उपक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील २० कष्टकरी कामगार महिलांसाठी मुंबईला नेण्यात येण्याचा हा उपक्रम राबविला जात आहे. रसिकाश्रय या यवतमाळ येथील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेकडून हा उपक्रम राबविला जात आहे. आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या या महिलांच्या जीवनात जो आनंद कधी मिळाला नसता तोच आनंद पाहायला मिळत आहे.

ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याची संधी 

गावाच्या पलीकडे जाण्याचे कामही फारसे पडत नसते. यात रेल्वेतही प्रवास न करणाऱ्या महिलांना चक्क जीवाची मुंबई करण्याची संधी लाभली आहे. हे सगळं स्वप्नवत वाटणाऱ्या महिलांना रसिका आश्रम आणि जीवाची मुंबई टीमने वास्तवात करून दाखवल आहे. या महिलांना मुंबईची सफर तर होणार आहेच. पण ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याची संधी देखील महिलांना मिळणार आहे.

आदिती ताटकरेंसोबत भोजनाचा आनंद 

रोज सकाळी उठून दुसऱ्याच्या घरी जाऊन धुनीभांडे करणे खरंतर हेच त्यांचे आयुष्य. मात्र त्यांच्या या श्रमाची संवेदना जपत डोळ्यात आनंद फुलवण्यासाठी जीवाची मुंबईची सफर घडवली जात आहे. हे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूतून पाहायला मिळत आहे. रोज लोकांचा घरात टोमणे खाणाऱ्या शिवा खाणाऱ्या महिलांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या सोबत भोजनाचा आनंद घेता येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT