Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : शेतातून घरी जाताना आई- मुलावर काळाची झडप; वीज कोसळून जागीच मृत्यू

Nagpur news : शेतात काम असल्याने मेश्राम कुटुंबीय कामासाठी गेलेले होते. दुपारच्या सुमारास पावसाचे वातावरण झाले. यानंतर काम आटोपल्याने आई व मोठा मुलगा दुचाकीने जात असताना दुर्दैवी घटना घडली आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: राज्यात दोन दिवसांपासून आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील काही भागात पाऊस सुरु झाला असून यासोबत वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशात शेतातून फवारणीचे काम करून दुचाकीने घरी जात असताना वीज कोसळल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील मांढळ शेतशिवारात घडली आहे. 

नागपूरच्या कुही तालुक्यातील मांढळ शेतशिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत सुनिता दशरथ मेश्राम (वय ४५) आणि त्यांचा मुलगा धम्मशिल दशरथ मेश्राम (वय २५) असे मृत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. मेश्राम कुटुंबीय दिवसभर शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान शेतात फवारणी करून मोटरसायकलने सुनीता व धम्मशिल मेश्राम हे घरी जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी विज कोसळल्याने दुर्घटना घडली आहे.

कुटुंबातील तिघेजण बचावले 
यावेळी मेश्राम कुटुंबातील आणखी तिघे जण शेतात होते. काम आटोपून आई व मोठा मुलगा लवकर घरी निघाले होते. या अपघातात मोठ्या मुलाचा जीव गेला असून वडील, आजी आणि लहान मुलगा सुखरूप आहेत. दरम्यान गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे जखमींना दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले. कुटुंबियांना शासन स्तरावरून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

वीज पडून गाय दगावली
नांदेड जिल्ह्याला ९ ऑगस्टपर्यंत येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास नांदेडच्या हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसासोबतच हदगाव तालुक्यातील वडगाव येथे वीज पडून एका शेतकऱ्याची गाय दगावली. वडगाव येथील शेतकरी नामदेव पवार यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडा खाली गाय बांधली होती. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि पवार यांच्या लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या गाईवर वीज कोसळली. गाय दगावल्याने  यात या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये मराठी-अमराठी वाद! परप्रांतीय हॉटेलचालकाचे मराठी माणसांबद्दल अपशब्द, मनसैनिकांनी काय केलं पाहा; VIDEO

घरातून पळून आली, ड्रायव्हरची वाईट नजर, २ दिवस बसमध्ये बलात्कार; परिसरात खळबळ

Crime News: नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १० कोटींचं ‘मेफेड्रॉन’ जप्त

Agriculture Scheme: जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी सरकार करेल मदत; कसा कराल अर्ज, काय आहे पात्रता?

Akola Police : दहशत माजविणाऱ्यांची उतरविली मस्ती; पोलिसांनी शहरातून काढली धिंड

SCROLL FOR NEXT