Nagpur Police Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Police : एमडी तस्कर पोलिसांच्या ताब्यात; १२ ग्रॅम ड्रग्ससह मुद्देमाल जप्त

Nagpur News : अनेक वर्षांपासून बेकायदेशीर धंद्यात सक्रिय आहे. सध्या त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पाचपावली पोलीस पुढील तपास सुरु

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : मागील अनेक दिवसांपासून ड्रग्स तस्करी करण्यात सक्रिय असलेल्या कुख्यात एमडी तस्कर शेख झायेदला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२ ड्रग्ससह मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरु असून त्याच्या साथीदारांचा देखील तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. 

नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत पाचपावली पोलिसांनी कुख्यात एमडी तस्करला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे आशीनगर भागातील ताज हॉटेलजवळ छापा टाकत १२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली. यात झायेद शेख रहमान खान या कुख्यात एमडी तस्कराला पोलिसांनी याठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. दरम्यान  शेख झायेदवर यापूर्वीही नंदनवन आणि वाठोडा पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.
 

अनेक वर्षांपासून करतोय तस्करी

हसनबाग येथील रहिवासी कुख्यात एमडी तस्कर शेख झायेद शेख रहमानकडून १२.६४ ग्रॅम एमडी पावडर सापडली. याशिवाय पोलिसांनी एक मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त केली आहे. तर तो गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर धंद्यात सक्रिय आहे. सध्या त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पाचपावली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जालन्यात जुगार अड्ड्यावर छापा, आठ जण ताब्यात
जालना : जालन्यातील नळ गल्ली येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली. नळ गल्ली येथील एका घराच्या रूममध्ये काही इसम गोलाकार बसून तीर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा कारवाई करत जुगार खेळणाऱ्या सात जणांना रंगेहाथ पकडले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT