Nagpur Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Fraud Case : डुप्लिकेट कुलर बनवून व्यवस्थपकाने कंपनीची केली फसवणूक; मध्यप्रदेश, राजस्थानच्या विक्रेत्यांवरही गुन्हा दाखल

Nagpur News : नागपूरात तयार होणाऱ्या राम कुलर यांचा व्यवसाय अनेक राज्यात पसरला आहे. या कंपनीचे मुख्यालय नागपूरात आहे. कंपनीत सुधीर चौबे हे व्यवस्थापक म्हणून काम सांभाळत होते

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपुरातून विविध राज्यात विकल्या जाणाऱ्या राम कुलरच्या व्यवस्थापकाने चक्क बनावट कुलर बनवून कंपनीला चुना लावला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसात २० लाखात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुधीर चौबे असे व्यवस्थापकाचे नाव आहे. यांच्यासह मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील विक्रेते अश्या चौघांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

नागपूरात (Nagpur) तयार होणाऱ्या राम कुलर यांचा व्यवसाय अनेक राज्यात पसरला आहे. या कंपनीचे मुख्यालय नागपूरात आहे. कंपनीत सुधीर चौबे हे व्यवस्थापक म्हणून काम सांभाळत होते. व्यवस्थापक पदावर असताना कुठलाही व्यवसाय करता येणार नाही. तशीच गोपनीय माहिती लिक करता येणार नाही. यापद्धतीच्या अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या. असे असताना देखील त्यांनी कंपनीच्या डीलरचा डेटा वापरला. बनावट कुलर तयार करून राम कुलरच्या नावाने बाहेर राज्यात विक्री केली. त्यासाठी सुधीर चौबे ह्यांनी राज्यस्थान आणि मध्य प्रदेशातील जुन्या डीलरला संपर्क साधला.

कंपनीचे २० लाखाचे नुकसान 
डीलरशी संपर्क साधून बनावट कुलर तयार करून ते अन्य राज्यात पाठवले. विशेष म्हणजे त्या कुलरची विक्री राम कुलरच्या नावाने केली. या पद्धतीने (fraud) बनावट राम कुरलाच्या नावाने विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या संचालकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी गणेश पेठ पोलिसात (Police) तक्रार नोंदवली. बनावट कुलर तयार करून जवळपास २० लाख रुपयांचा कंपनीचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीच्या संचालकाकडून करण्यात आला. सदर प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करत व्यवस्थापक चौबे यांच्या बँक खाते तसेच संबंधित डीलर ज्यांना कुलर विकण्यासाठी मदत केली, त्यांचेही बँक खाते तपासणार आहे. पुढील तपास गणेश पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT