Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूरमधील धक्कादायक घटना! समलैंगिकतेला घरच्यांचा विरोध; लेस्बियन मुलीने संपवले आयुष्य

संजय डाफ

Nagpur News: समलैंगिकतेच्या तणावातून लेस्बियन विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात हा प्रकार घडला असून घरच्यांचा विरोध असल्याने मुलीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समलैंगिक संबंधाला कुटूंबाचा विरोध होत असल्याने लेस्बियन मुलीने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या (Nagpur) गिट्टीखदान परिसरातील ही घटना असून आत्महत्येपुर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमधून खुलासा झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

संबंधित मुलगी ही बी.ए च्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. या दरम्यान तिने तिच्या समलैंगिकतेबद्दल तिच्या कुटूंबियांना सांगितले. मात्र तिच्या घरच्यांनी त्याला विरोध करत तिच्या लग्नासाठी मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. यामुळेच तणावाखाली येवून तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

उल्हासनगरमध्ये भावानेच केली बहिणीची हत्या...

उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात १२ वर्षीय मृत मुलगी ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनी सोबत राहत होती. तर तिचे आईवडील गावी राहतात. या मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मासिक पाळी आली. मात्र ते पाहून तिच्या वहिनीने नवऱ्याला चुकीची माहिती देवून गैरसमज निर्माण केल्याने भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SRH vs PBKS: पंजाब की हैदराबाद; कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT