Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News : अभ्यासाच्या तणावातून एमसीएच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; मन सुन्न करणारी घटना

यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Ngapur News in Marathi : नागपुरातून एक मन सुन्न करणारी घटना घटना समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पेपरचा अभ्यास झाला नसल्याच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या केली. अभ्यास न झाल्यामुळे उद्याच्या पेपरमध्ये काय लिहिलणार, या टेन्शनमुळे एमसीएच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना मानकापूर (Mankapur) येथील गोधनी रेल्वेलाईनवर बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यश माने अस मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो एमसीएचा विद्यार्थी होता. तो व्हीएमव्ही महाविद्यालयात एमसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, यशचा आज बुधवारी सकाळी एमसीएचा पेपर होता. मात्र, काल रात्री बारा वाजताच्या सुमारास तो घरातून कुणालाही न सांगता निघून गेला. यश रात्री घरून निघून गेल्यावर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.

मात्र तो कुठेही सापडला नसल्याने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी नातेवाईक गेले असता रेल्वेखाली उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. दुर्दैवाने तो तरुण यशच होता. यशचा मोठा भाऊ अतुल आयटी कंपनीत नोकरीला असून, वडील प्रकाश माने सुरक्षारक्षक आहेत. यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT