Nagpur Dengue Viral Saam tv
महाराष्ट्र

Dengue Viral : नागपुरात डेंग्यूचा प्रकोप; तिनशेवर रुग्ण, तीन हजारांवर संशयित

Nagpur News : नागपुरात डेंग्यूचा प्रकोप; तिनशेवर रुग्ण, तीन हजारांवर संशयित

संजय डाफ

नागपूर : नागपुरात डेंग्यू आजाराचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. सध्या नागपुरात (Nagpur) डेंग्यूचे तिनशेवर रुग्ण असून तीन हजारावर संशयित रुग्ण आहेत. शासकीय आणि खाजगी रुग्णालयात संशयित डेंग्यू (Dengue) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यात महापालिकेला कुठेतरी अपयश येत असल्याचं चित्र आहे. (Breaking Marathi News)

नागपूर शहरात स्वच्छतेचे अनेक दावे करण्यात येत असले; तरी डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या बघता त्याला रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे ठाकले आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्यास अस्वच्छता, साचलेले पाणी कारणीभूत असते. शहरातील बऱ्याच रिकाम्या भूखंडांवर पाणी साचल्याने डासांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे शहरातील अनेक घरांतील कुलर अद्यापही काढण्यात आले नाहीत. त्यामुळे या कुलरच्या पाण्यांतही डासांची संख्या वाढल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Health Department) नोंदवण्यात आले आहे. महापालिकेकडून डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेणे, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची माहिती व इतर सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या पथकाकडून घरांची तपासणी सुरू आहे. यात ज्याठिकाणी साचलेले पाणी, अडगळीतील साहित्य असेल अशा ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनीही यात सहकार्य करून परिसर स्वच्छ कसा ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन महापालिका आयुक्त अभिषेक चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hirvi Mirchi Loncha: हिरव्या मिरचीचा झणझणीत लोणचा अवघ्या १० मिनिटांत बनवा, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: बिहारमधील विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

बिहार चुनाव तो झाकी है, BMC बाकी है ! बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

Bihar Election: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची अलीनगरमधून दमदार आघाडी|VIDEO

Pune Accident : आईच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली, वाटेतच काळाने घातला घाला; पुण्यातील अपघातात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT