AI In Traffic Signal Saam tv
महाराष्ट्र

AI Based Traffic Signal : AI कंट्रोल करणार नागपुरातील ट्रॅफिक; दहा सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर होणार सुरवात

Nagpur News : नागपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो. हा प्रश्न सुटण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी एआय बेस्ड ट्राफिक सिग्नल लावण्यात येणार आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आमूलाग्र बदल होत असताना पाहण्यास मिळत आहे. यातच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्रात याचा वापर करण्यास सुरवात केली आहे. आता नागपूर शहरामधील ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी AI चा वापर केला जाणार आहे. अर्थात शहरात AI बेस्ड सिग्नल बसविले जाणार आहेत. याची प्रायोगिक तत्वावर सुरवात करण्यात आली आहे.  

नागपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो. हा प्रश्न सुटण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी एआय बेस्ड ट्राफिक सिग्नल लावण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञाचा वापर करून कुठल्या सिग्नलवर गर्दी आहे. याचे अवलोकन करून गर्दी कमी करण्यास सिग्नलच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. वेगाने वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, सिग्नल जम्पिंग सारख्या घटनाना सुद्धा आळा बसणार आहे.

१० सिग्नलवर करणार सुरवात 

प्रायोगिक तत्वावर हा प्रोजेक्ट असून सुरवातीला शहरातील १० ट्राफिक सिग्नलवर सुरू केले जाणार आहे. पश्चिम नागपूर भागातील १० सिग्नलचा यात समावेश केला आहे. या एआय बेस्ड ट्राफिक सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुकीचा प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. अर्थात याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण शहरातील सिग्नलवर हि यंत्रणा बसविली जाण्याची शक्यता आहे. 

१९७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित 

एआय तंत्रज्ञाचा वापर करून सिग्नल हाताळणी केली जाणार आहे. अर्थात या तंत्रज्ञानामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मनपा आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रयोग राबविला जात असून यासाठी सुमारे १९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र या तंत्रज्ञानामुळे वाहतूक सुरळीत होऊन गर्दी नियंत्रणात आणता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT