Nagpur News A two-year-old girl suffered a heart attack on the vistara airlines flight Saam TV
महाराष्ट्र

Heart Attack: उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुकलीला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांनी असा वाचवला जीव

Heart Attack News: एका दोन वर्षाच्या चिमुकलीची प्रकृती बिघडली. तिला विमानातच हृदयविकाराचा झटका आला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती बेशुद्ध झाली.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Latest News: दिल्लीला येणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या विमानाने बंगळुरूहून उड्डाण भरलं. विमानातील सर्व प्रवासी आनंदात होते. मात्र अचानक एका दोन वर्षाच्या चिमुकलीची प्रकृती बिघडली. तिला विमानातच हृदयविकाराचा झटका आला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती बेशुद्ध झाली. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. (Latest Marathi News)

सुदैवाने या विमानातून पाच डॉक्टर प्रवास करीत होते. यावेळी डॉक्टरांनी सतर्कता दाखवत या चिमुकलीवर ४५ मिनिटे उपचार केले. त्यानंतर तातडीने हे विमान नागपूरकडे वळण्यात आले. मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. या घटनेबाबत दिल्ली एम्सने सोशल माध्यमांवर दुजोरा दिला आहे.

डॉक्टरांच्या (Doctor) सतर्कतेमुळे दोन वर्षीय चिमुकलीचा जीव वाचल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विस्तारा एअरलाइनचं विमान बंगळुरूहून दिल्लीला येण्यासाठी निघालं होतं. यावेळी विमानात अचानक दोन वर्षाच्या चिमुकलीची प्रकृती बिघडली. तिला हृदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास सुरू झाला.

ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे तातडीने हे विमान नागपूरकडे वळण्यात आले. सुदैवाने या विमानातून पाच डॉक्टर प्रवास करीत होते. त्यांनी या चिमुकलीचा जीव वाचवला. दरम्यान, या चिमुकलीला “सायनोटिक” आजाराने ग्रासले होते.

त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने तिची नाडी बंद झाली, चिमुकलीचे हात-पायही थंड पडले होते, तसेच तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. याशिवाय तिचे ओठ आणि बोटेही पिवळी पडली होती. विमानातील डॉक्टर उपचार करीत होते. तेव्हा मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांसमोरील अडचणी वाढल्या होत्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: मनमाड शहरात विजांच्या गड गडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Sarfaraz Khan: 'खान' आडनावामुळे खेळाडूला डच्चू; सरफराजच्या सिलेक्शनवरून वाद पेटला, औवेसीनंतर काँग्रेस नेत्याचे गौतमवर 'गंभीर' आरोप

Bhau Beej 2025: भाऊबीज करताना आरतीच्या ताटात ठेवा या वस्तू, संपूर्ण लिस्ट वाचा

SCROLL FOR NEXT