Nagpur news  saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : नागपूरमध्ये तिरंग्याचा अपमान ? तलावाच्या काठावर 4 हजार राष्ट्रध्वज फेकले

नागपूरच्या (Nagpur) कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात हा प्रकार दिसून आला आहे. चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रध्वज टाकून दिल्याचे समोर आले आहे.

संजय डाफ

Nagpur News In Marathi : केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याचा महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी देशातील कोट्यावधी लोकांनी घरावर राष्ट्रध्वज फडकवले. त्याकाळात अनेकांना राष्ट्रध्वज देखील उपलब्ध झाले नव्हते. हर घर तिरंगा मोहिमेनंतर नागपूरमध्ये चार हजार ध्वज तलावाच्या काठावर फेकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नागपूरच्या (Nagpur) कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात हा प्रकार दिसून आला आहे. चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रध्वज टाकून दिल्याचे समोर आले आहे.

नुकतंच शासनाच्या निर्देशाप्रमाणे हर घर तिरंगा मोहीम पार पडली. देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावे यासाठी ही मोहीम आखली होती. प्रत्येक कुटुंबाला राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज माफक किमतीत लोकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान ठेवला नसल्याचे समोर आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील कोराडीपासून काही अंतरावरील कोराडी तलावाला लागून असलेल्या नांदा परिसरात चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रध्वज टाकून दिल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे एका बोऱ्यावर मौदा पंचायत समिती असे लिहिले असून हर घर तिरंगा मोहीम पार पडल्यानंतर कोणीतरी बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी किंवा पुरवठादाराने अशा पद्धतीने राष्ट्रध्वज तलावाच्या काठावर टाकले आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रध्वजाच्या अपमान केल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी टाकून देण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांची संख्या ३ हजार ९६५ एवढी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT