Hingana Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: दुचाकीच्या चाकात ओढणी अडकली अन् अनर्थ घडला; टिप्परखाली आल्याने २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Hingana Accident News: भरधाव टिप्परच्या धडकेत २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगणाच्या वानाडोंगरी परिसरात घडली.

Satish Daud

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

Nagpur Hingana Accident News

कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणीवर काळाने झडप घातली. दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने तरुणी अचानक खाली कोसळली. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने तिला चिरडलं. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात घडली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रितीका निनावे (वय २१) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितीका निनावे ही हिंगणा (Nagpur News) येथील वाय.सी.सी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.

रितीका बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या चौथ्या वर्षात शिकत होती. सोमवारी (४ मार्च) महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा आटोपून ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन वानडोंगरी परिसरातून घरी जात होती. (Latest Marathi News)

त्याचवेळी रितीकाची ओढणी दुचाकीच्या चाकात अडकली. काही क्षणात रितीका जमिनीवर कोसळली. पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने तिला चिरडलं. टिप्परचे मागचे चाक रितीकाच्या अंगावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे हिंगणा- बर्डी मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रातील या गावात शिवी दिल्यास आकारला जातो दंड? काय आहे नियम वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, मशीन आणि औषधं जप्त

Winter Skin Care : हिवाळ्यातील जादुई फेसपॅक, रोज चमकेल त्वचा

Accident: बॅरियरला धडकत कार उड्डाणपूलावरून खाली कोसळली; शबरीमालाला जाणाऱ्या ४ जणांचा जागीच मृत्यू

Lasun Chutney: रोज वरण भात खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम भाकरीसोबत करा लसणाच्या स्पेशल चटणीचा बेत

SCROLL FOR NEXT