Nagpur Nandanvan Colony News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, गर्लफ्रेंडनेच रचला होता कट; आधी बॉयफ्रेंडला संपवलं नंतर...

Nagpur Nandanwan News : नागपूर नंदनवन परिसरात तरुणाच्या हत्येबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. तरुणाची हत्या त्याच्याच प्रेयसीने केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाचा हत्या

  • आरोपी तरुणीने स्वतःलाही जखमी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

  • मृत तरुण पोलीस भरतीची तयारी करत होता

  • प्रकरणामुळे नंदनवन परिसरात खळबळ

नागपूर शहारतील नंदनवन परिसरात ४ डिसेंबर रोजी एका तरुणावर आणि तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला होता तर तरुणी गंभीर जखमी झाली होती. ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता, मात्र आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित तरुणाच्या गर्लफ्रेंडनेच ही हत्या करून स्वतःवरही हल्ला केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मृत तरुणाचं नाव बालाजी कल्याने असून त्याच्या प्रेयसीच नाव रती असं आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बालाजीला पोलीस व्हायचं होत. हे स्वप्न पूण करण्यासाठी तो मित्राच्या खोलीत राहून पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याची गर्लफ्रेंड रती ही अधूनमधून त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी ये जा करायची. हल्ल्याच्या दिवशी सुद्धा रती बालाजीला भेटायला गेली. बालाजीने रतीवर लग्नासाठी दबाव आणला होता. मात्र रतीच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. त्या दोघांमध्ये लग्न करण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला.

संतापलेल्या तरुणीने चाकूने बालाजीवर वार केला. या झटापटीत बालाजीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तरुणीने स्वतःवर हल्ला करून जखमी करून घेतलं. त्यानंतर आरोपी तरुणी आणि मृत तरुण एकाच घरात आढळले. त्यानंतर स्थानिकांना ही घटना समजताच त्यांनी जखमी दोघांना रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता. तरुणीने सुरुवातीला वेगवेगळे जबाब दिले. आरोपीने तरुणीने मोबाईल फॉर्मॅट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र बालाजीच्या भावाने पोलिसांना दिलेल्या तक्ररीवरून तरुणीच पितळ उघडं पडलं आहे. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro Fight: मेट्रोत हाय वोल्टेज ड्रामा; दोन महिलांचा जागेवरुन वाद, झिंज्या उपटल्या अन्.. VIDEO व्हायरल

Maharashtra Politics: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार, 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमध्ये स्मशानभूमीत भानामती; दोघांना ग्रामस्थांनी पकडले

नवरीला हळद लागल्यानंतर विपरीत घडलं, लग्नच रद्द झालं; कल्याणच्या हायप्रोफाइल सोसायटीत घडली धक्कादायक घटना

Crime News: रॉडनं मारलं, नंतर सुनेचा हात कापला; सासरा आणि पती म्हणाले, 'अधिकारी किंवा नेते कोणीही आमचं काही करू शकत नाही...'

SCROLL FOR NEXT