Nagpur Muncipal Corporation Election 2025-2026 Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : सकाळी काँग्रेसची साथ सोडली, रात्री भाजपातून उमेदवारीचा अर्ज भरला; नागपुरात राजकारण ३६० डिग्री फिरलं!

Nagpur Muncipal Corporation Election 2025-2026 : उत्तर नागपूर प्रभाग २ मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका नेहा निकोसे यांनी दिवसा काँग्रेसचा राजीनामा देत रात्री भाजपचे तिकीट मिळवले.

Alisha Khedekar

  • उत्तर नागपूर प्रभाग 2 मध्ये काँग्रेसला मोठी गळती

  • नेहा निकोसे यांचा राजीनामा, भाजपमधून तिकीट निश्चित

  • भाजपची रणनीती आक्रमक

  • नागपुरात युती आघाडीचा सस्पेंस कायम

राज्यात एकीकडे महापालिकेच्या निवडणुकांची लगबग असताना दुसरीकडे पक्षापक्षांमध्ये फोडाफोडी सुरूच आहे. अशातच उत्तर नागपुरातील प्रभाग दोनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी नगरसेविका नेहा निकोसे (Neha Nikose) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. एवढेच नाही तर, दुपारी काँग्रेस सोडत रात्री भाजपची प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी सुद्धा मिळवली. त्या प्रभागातून आणखीन काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

उत्तर नागपूर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपला तसा कठीण जाणारा भाग समजला जातो. नेहा निकोसे या २०१७ मध्ये प्रभाग २ मधून निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना काँग्रेसने डाववल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला व लगेच त्यांना तिकीट मिळाले.

सोबतच उत्तर नागपूर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष बाबू खान, महेंद्र बोरकर, राकेश निकोसे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. माजी मंत्री नितीन राऊत हे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत असून काँग्रेस या चुकीचे फळ भोगावे लागणार आहे. जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांना डावलण्याचं काम काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी केलं आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून धडा शिकवणार असेही काँग्रेस सोडून आलेले नेते बाबू खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अनेक जण काँग्रेस सोडून भाजपमध्ये येणार असा दावाही बाबू खान यांनी केला.उमेदवारी अर्ज सादर करण्याला अवघे काही तास शिल्लक असताना, नागपूरमध्ये अद्यापही युती आणि आघाडीचा सस्पेंस कायम आहे.दरम्यान नागपूर महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बांधकाम व्यावसायिकांच्या घरी ईडीचे पथक दाखल

Ashok Kharat: अशोक खरातच्या घरात ई़डी, आलिशान कारसह मालमत्ताही होणार जप्त

IPL मध्ये मोठी उलथापालथ; अचानक वेळापत्रकात मोठा बदल, ऐनवेळी ठिकाणच बदलले, काय आहे कारण?

Accident News : मेव्हणीला पळवून नेत होता भावोजी; आडवायला आलेल्या सासरच्यांना कारने चिरडले, मेव्हण्यासह तिघांचा मृत्यू

Nashik Crime: नाशिक हादरले! दिवसाढवळ्या महिलेकडून तरुणाची हत्या, आधी दगडाने ठेचलं नंतर कोयत्याने सपासप वार; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT