मंगेश मोहिते
नागपूर - गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अलीकडेच भाजपमधील अनेक नगरसेवक, नेते, कार्यकर्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. यातच आता विदर्भातील एका बड्या नेत्याने पक्षावर गंभीर आरोप करत भाजपला रामराम ठोकला आहे.
पक्षावर नाराज असलेले नेते छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत , पशु संवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. देवडिया काँग्रेस भवन मध्ये बैठकीच आयोजन करण्यात आले होते यावेळी हा पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यांनतर छोटू भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील पहा -
छोटू भोयर म्हणले की, काँग्रेसमध्ये प्रवेश करत असलो तरी संघाची शिकवण आणि विचार मनातून नाहीसे होणार नाहीत. काँग्रेसमधून विधान परिषदेची उमेदवारी नक्कीच माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. उमेदवारीसाठी नाही, तर पक्षात ज्या पद्धतीचा व्यवहार झाला त्यामुळे राजीनामा दिला, असे देखील भोयर यांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणले की, 34 वर्षे भाजपसोबत काम केले. पक्ष सोडताना मनात वेदना होत आहेत. मात्र ज्या पक्षाला वाढवण्यासाठी दिवस-रात्र काम केलं, त्याच पक्षात मला दाबण्यात आलं आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडे मी विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला प्रत्येक वेळेला मी या निवडणुकीत उभा राहणार नाही, असे सांगितले होते. मात्र मला उमेदवारी नाकारण्यात आली. बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारताना काय कारणे होती आणि ती सर्व कारणे नाहीशी झाली आहेत का? याचे स्पष्टीकरण भाजप नेतृत्वाने दिले पाहिजे. या मतदारसंघात भाजपकडे मोठी आघाडी आहे, असे म्हणतात. मात्र, भाजपकडे जेवढी आघाडी आहे तेवढ्याच मतांनी भाजप पराभूत झालेला पाहायला मिळेल, असा दावा देखील भोयर यांनी यावेळी केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.