Nagpur News  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपुरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अपघात

नागपूरच्या बेसा परिसरातील नाल्याच्या किनाऱ्यावर स्कूल व्हॅन घुसल्याची बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर: नागपूरच्या बेसा परिसरातील नाल्याच्या किनाऱ्यावर स्कूल व्हॅन घुसल्याची बातमी समोर आली आहे. या व्हॅनमध्ये शाळेतील मुल असल्याची माहिती मिळत आहे. यातील दोन मुलं किरकोळ जखमी झाले आहेत. स्टेरिंग लॉक झाल्याने ही व्हॅन अर्धवट उलटली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसामुळे (Rain) चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेली माहिती अशी, आज सकाळी सुमारे १८ विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन शाळेच्या दिशेने जात होती. यावेळी मुसळधार पाऊस (Rain) सुरू असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्कूल व्हॅन थेट नाल्यात जाऊन पडली आहे.

सुदैवाने नाला जास्त खोल नसल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित सर्व विद्यार्थी सुखरूप असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. घटेनची माहिती समजताचं परिसरातील लोकांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यामुळे स्कूल व्हॅनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढणे शक्य झाले, त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हा अपघात पावसामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाने सुरूवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना समोरचे काही दिसत नाही, त्यामुळे समोरुन येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT