Police  Saam
महाराष्ट्र

Crime : पोलीस स्टेशनमध्ये राडा, बायको तक्रार करायला गेल्यावर पोलिसाची सटकली, मग..

Nagpur police drama : नागपूर मधील लकडगंज पोलीस ठाणे येथे पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिस कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली. आरोपीविरुद्ध BNS कलम १३२ अंतर्गत गुन्हा दाखल.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

nagpur Lakadganj police station incident : पोलीस नवऱ्याची तक्रार करायला महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. पण तिथे वेगळाच राडा अन् ड्रामा झाला. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना मारहाण अन् शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्यात गुरूवारी हायव्होल्टेज ड्रामा झालाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या वागणुकीच्या प्रकारावर नागपूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पती-पत्नीतील वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यावर लकडगंज पोलीस ठाण्यातच कर्मचार्‍याचा हाय-व्होल्टेज ड्रामा झाला. पोलीस कर्मचाऱ्याकडून सहकारी पोलिसाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. पत्नीने पोलीस पती विरोधात तक्रार दिल्यावर पोलीस कर्मचाऱ्याचा पारा चढला अन् स्टेशनमध्येच राडा घातला. या प्रकारामुळे पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

१२ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे आपल्या शासकीय कर्तव्यावर हजर होते. त्याच वेळी, आरोपी पोलीस शिपाई किरण कुकलारे यांची पत्नी आपल्या भावासोबत त्याच ठाण्यात पोलीस असलेल्या पतीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली होती. पत्नीने फोन केल्यावर आरोपी पोलीस कर्मचारी किरण कुकलारे तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तिथे पोहोचताच वातावरण तापले.

आधी किरण कुकलारेने फोनवरच वाद घालण्यास सुरुवात केली होती. पुन्हा पोलीस ठाण्यात आल्यावर त्याने सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या संपूर्ण प्रकारानंतर, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT