nagpur  Saam
महाराष्ट्र

Nagpur Crime : तरूण मुलाचं डोकं सटकलं; जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केली; कारण धक्कादायक, त्या दिवसाची इनसाइड स्टोरी!

son killed mother and fathter : इंजिनीअरिंगला असलेला मुलगा वारंवार अपयशी ठरत होता. याच अपयशी मुलानं जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केली. नागपूरमध्ये ही महाभयंकर घटना घडली. या हत्याकांडामागचं धक्कादायक कारण उघड झालंय.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : नागपुरातील इंजिनीअरिंगला असलेल्या विद्यार्थ्याने जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूरमधील इंजिनीअरिंगला असलेल्या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खसारा परिसरामध्ये मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील महिन्यातील 26 डिसेंबरची ही घटना आहे. घरात दुर्गंधी पसरल्याने घटना उघडकीस आली आहे. लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे मृत आई-वडिलांचे नाव आहे. उत्कर्ष डाखोळे असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे.

लीलाधर डाखोळे कोराडी थर्मल प्लांटमध्ये टेक्नीशियन होते. तर आई अरुणा डाखोळे प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष 6 वर्षापासून इंजीनिअरिंग शिकत होता. मात्र त्याचे काही पेपर बॅक राहिले होते. वारंवार नापास होत असल्याने आई-वडीलांनी त्याला दुसरे शिक्षण घेण्याकरिता सांगितले. तसेच इतर काही करण्याकरता आग्रह करत होते.

मात्र त्यामुळे त्याची नाराजी होती. आई-बाबांसोबत त्याचे खटके उडत होते. याच रागातून 26 डिसेंबरला दुपारी एक वाजता आईची हत्या केली. संध्याकाळी पाचनंतर वडील घरी आल्यावर चाकूने वार करत वडिलांची हत्या केली. दरम्यान उत्कर्ष कोणती नशा करत होता का, याचाही तपास पोलीस करत आहे.

वडिलांची हत्या केल्यानंतर त्यानं बहिणीला आई-वडील मेडिटेशन करिता बेंगळूरूला गेल्याचं सांगितले. बुधवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर ही घटना उघडकीस आली. मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याने परिसरात एकच भीती पसरली आहे. दोघांच्या मृत्यने ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT