Nagpur 12 Year Old Boy Death Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur News : नागपूरच्या १२ वर्षीय जयेशचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Nagpur 12 Year Old Boy Death : भटका कुत्रा अंगावर धावून आला. त्याच्यापासून बचावासाठी १२ वर्षीय मुलगा धावत धावत बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर गेला. कुत्रा तेथेही पोहोचला. घाबरलेल्या मुलाचा तोल जाऊन तो सहाव्या मजल्यावरुन खाली पडला आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Prashant Patil

नागपूर : भटका कुत्रा अंगावर धावून आला. त्याच्यापासून बचावासाठी १२ वर्षीय मुलगा धावत धावत बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर गेला. कुत्रा तेथेही पोहोचला. घाबरलेल्या मुलाचा तोल जाऊन तो सहाव्या मजल्यावरुन खाली पडला आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनगाव येथील देव हाइट्समध्ये घडली. जयेश रवींद्र बोकडे असे मृत मुलाचे नाव होतं.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेशचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम होतं. त्याच्या घरात छोटा ससा होता. रविवारी तो त्या सस्यासोबत खेळत असताना एक भटका कुत्रा त्याच्या मागे लागला. भीतीने तो काडी घेऊन सहाव्या मजल्यावरील खिडकीवर उभा राहिला. जयशने त्या कुत्र्याला तिथून हुसकावलं. तरी तो भुंकत असल्याने त्याचवेळी जयेशचा तोल जाऊन तो खाली पडला, आणि यातच जयेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचावर मेयो रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांनंतर कुटुंबियांना त्याचा मृतदेह सोपवण्यात आला. जयेशचे वडील हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे.

आपलं सोन्यासारखं लेकरू गमावल्यामुळे जयेशच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. रडून रडून ते बेहाल झाले आहेत. या प्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी नागपुरकरांकडून केली जात आहे. या घटनेची सध्या नागपूरमध्ये सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT