नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची नवी निवडणूक रणनीती
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी
नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
राज्यातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये युद्ध सुरू झालंय. सर्व जागांवर बंडखोरी झाली असून महायुतीमधील तिन्ही पक्ष भाजप-राष्ट्रवादी, शिवसेना आमने-सामने आलेत. या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. आगामी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलीय. बावनकुळेंना प्रभारी बनवण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपनं मुनगंटीवार यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पक्षाला २०२० मध्ये मोठा धक्का बसला. त्यामुळे यंदा नेत्यांकडून ही निवडणूक गंभीरतेने घेण्यात आलीय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून मोठी रणनीती आखण्यात येत आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रभारी म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नावाची घोषणा करण्यात आलीय. तर महायुती समन्वयक म्हणून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्याचबरोबर राज्यमंत्री पंकज भोयर आणि डॉ. आमदार परिणय फुके यांची सहभागी म्हणून निवड करण्यात आलीय. विदर्भाचे संघटक प्रमुख म्हणून डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांची निवड करण्यात आली. ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळत होते.
दरम्यान पक्षशिस्तीला बाजूला सारून माजी आमदार अनिल सोले व पदाधिकारी ॲड. रमण सेनाड यांनी बंडखोरी केल्याने नागपूरमध्ये भाजपसमोर आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी नागपूर पदवीधर निवडणूक समितीची घोषणा केलीय. ही सर्व पदे व जबाबदाऱ्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्यात.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर व आ.परिणय फुके यांच्याकडे सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांना निवडणूक प्रमुख करण्यात आलंय. यासह मतदार नोंदणीत सहप्रमुख असलेल्या सुधीर दिवे हे निवडणूक सहप्रमुख राहतील.त्यांच्याकडे नागपूर ग्रामीण, वर्धा, चंद्रपूर शहर व ग्रामीण, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर दुसरे निवडणूक सहप्रमुख गिरीश देशमुख यांच्याकडे नागपूर शहराची धुरा राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.