Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

Nagpur News : नागपुरात बनावट अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर अभियांत्रिकी प्रवेश मिळवल्याचा मोठा घोटाळा उघड. प्राध्यापकांसह ११ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून सखोल तपास सुरू.

Alisha Khedekar

  • नागपुरात बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड

  • ११ जणांवर गुन्हा दाखल

  • प्राध्यापकांचाही समावेश

  • अभियांत्रिकी प्रवेशासाठी बनावट ST प्रमाणपत्राचा वापर

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

पराग ढोबळे, नागपूर

व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून प्रवेश मिळवल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस जात प्रमाणपत्र तयार करण्याचे रॅकेट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पुढे काय नवीन खुलासे होते याकडे सर्वांचे लक्ष लागलय.

मिळालेल्या माहितीनुसार,गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचे प्राध्यापक मोहन करंभे, शुभम खोरगडे, आणि अमोल घोडे आणि तीन विद्यार्थ्यांचा सह एकूण ११ जणांवर पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी मध्ये बोगस प्रमाणपत्राचा वापर करून प्रवेश मिळवला आहे.

यासोबत पिंपरी चिंचवड येथील रावेत कॉलेजला सुद्धा प्रवेश मिळवल्याच सांगितलं जातं आहे. त्यामुळे कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी आणि पालक या सोबत बोगस प्रमाणपत्र तयार करणारे यांची ही चौकशी पोलीस विभागाकडून केली जाणार आहे. या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

अनुसूचित जमाती पडताळणी समितीच्या सहाय्यक आयुक्त अमिता पिल्लेवार उपसंचालक नीरज मोरे, संशोधन अधिकारी नयन कांबळे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. यामध्ये पाचगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत या संपूर्ण प्रकाराचे पायामुळे शोधून काढण्याचा काम सुरू केला आहे त्यामुळे याचे पायामुळे राज्यभरात पसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT