Nagpur Ration Card Free Foodgrain Scheme 13,241 Ineligible Beneficiaries Removed AI Image
महाराष्ट्र

Ration Card : रेशनकार्ड धारकांवर मोठी कारवाई, महिनाभरात १३ ,२४१ लाभार्थ्यांचा लाभ बंद; कारण आलं समोर

Maharashtra Government Scheme Ration Card News : नागपूर शहरात ‘मिशन सुधार’ अंतर्गत मोफत धान्य योजनेची छाननी सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात १३,२४१ लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले असून आतापर्यंत ५५,६२२ जणांचे धान्य बंद करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • नागपूर शहरात गेल्या दीड महिन्यात १३ हजार २४१ लाभार्थी अपात्र

  • आतापर्यंत एकूण ५५ हजार ६२२ लाभार्थ्यांचा मोफत धान्याचा लाभ बंद

  • पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून छाननी सुरू

  • नागपूर शहरात सध्या ३ लाख ९५ हजार ६०५ लाभार्थी मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत

गरजू आणि गरीब नागरिकांसाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या मोफत धान्य योजनेचा लाभ अपात्र व्यक्ती घेत असल्याचे समोर आले आहे. नागपूर शहरात अशा लाभार्थ्यांची पडताळणी करून गेल्या दीड महिन्यात तब्बल १३ हजार २४१ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.

एखादं गरीब आणि गरजू कुटुंब उपाशी राहू नये, यासाठी पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून पूर्णपणे मोफत धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, या योजनेच्या निकषात न बसणारे काही लाभार्थीही याचा लाभ घेत असल्याची बाब प्रशासनाच्या पडताळणीत समोर आली. त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची नावे शोधून ती योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या निकषांमधून नागपूर शहरात आतापर्यंत तब्बल ५५,६२२ लाभार्थ्यांचे मोफत धान्य बंद करण्यात आले आहे. यामध्ये गेल्या दीड महिन्यात कारवाई करण्यात आलेल्या १३ हजार २४१ लाभार्थ्यांचाही समावेश आहे. प्रशासनाकडून लाभार्थ्यांची माहिती तपासून पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, नागपूर शहरात सुमारे १ लाख ८५ हजार ५५० लाभार्थी संशयास्पद आढळले असून, त्यांची नावे टप्प्याटप्प्याने लाभार्थी यादीतून वगळण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या काळात अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या नागपूर शहरात ३ लाख ९५ हजार ६०५ लाभार्थी मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाकडून लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. ‘मिशन सुधार’ मोहिमेच्या माध्यमातून अपात्र लाभार्थी वगळले जात असल्याने शासनाच्या धान्य योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे धान्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Heart Day: ब्लॉकेज कमी होतील आणि हार्ट अटॅक येणारच नाही! ही 1 भाजी करतील तुमच्या नसा साफ

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2026 मध्ये ‘या’ राज्यांनी वाढवला DA, तुमच्या राज्याचा नंबर आहे का?

Baramati Crime: बारामती हादरली! मध्यरात्री २ महिलांसोबत भयंकर घडलं, घरातील दृश्य पाहून सर्वजण घाबरले

Maharashtra News Live Update: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा

Mysterious Fort : २३०० वर्षांचा वारसा अन् १२ वर्षांचा वेढा, 'हा' किल्ला आहे रहस्यमय!

SCROLL FOR NEXT