Nagpur Fire Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Fire : नागपुरात अग्नितांडव! घरात सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन भीषण आग, ४ ते ५ अग्निबंब घटनास्थळी

Nagpur Fire update News : राज्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहरातील एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. या सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागली आहे.

Vishal Gangurde

Nagpur Fire Update :

राज्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहरातील एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. या सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागली आहे. नागपूरच्या नंदनवनमधील डायमंड परिसरात ही सिलिंडर स्फोटाची दुर्घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या नंदनवन परिसरातील डायमंड परिसरात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडर स्फोटामुळे संपूर्ण घर आगीच्या विळख्यात आलं आहे. या आगीच्या घटनेनंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाचे चार ते पाच अग्निबंब घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीमुळे घराचं मोठं नुकसान

नागपूरच्या नंदनवन परिसरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे दिसताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.

घराला आग लागल्यानंतर आगीचे लोळ दूरवरून दिसत आहे. या परिसरात एकापेक्षा अधिक सिलिंडर फुटल्याची माहिती मिळत आहे. या आगीमुळे मोठी वित्तहानी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये काल आागीची मोठी दुर्घटना

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात चार ते पाच आगीच्या दुर्घटना घडल्या. पिंपरी-चिंचवड शहराच्या कुदळवाडीतही आगीची मोठी दुर्घटना घडली. या भागातील एका कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. यामुळे कंपनीत मोठी आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर आलेल्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT