Nagpur Accident-prone Areas Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Accident-prone Areas: नागपूर जिल्ह्यात 66 जीवघेणे 'ब्लॅक स्पॉट', 3 वर्षात 1,749 नागरिकांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील 'ब्लॅक स्पॉट' अर्थात अपघातप्रवण क्षेत्र जीवघेणे ठरताहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 'ब्लॅक स्पॉट' अर्थात अपघातप्रवण क्षेत्र जीवघेणे ठरताहेत. जिल्ह्यात एकूण 66 ब्लॅक स्पॉट आहेत. या ब्लॅक स्पॉटमुळे जिल्ह्यातील 1 हजार 749 व्यक्तींना गेल्या तीन वर्षात जीव गमवावा लागलाय (Nagpur District Has 66 Accident-prone Areas 1749 Deaths In 3 Years).

एकाच ठिकाणी 10 आणि त्यापेक्षा अधिक अपघात (Accident) झाल्यास तसेच या अपघातात पाच आणि त्यापेक्षा जास्त मृत्यू (Death) झाल्यास त्या जागेला 'ब्लॅक स्पॉट' (Black Spot) म्हणजेच अपघात प्रवण क्षेत्र (Accident-prone Areas) म्हणतात. वाढते शहर, वाढती वाहने, त्या तुलनेत अरुंद होत असलेले रस्ते, रस्त्यांवरील उड्डाण पुलाचे चुकीचे बांधकाम यामुळे जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट वाढले आहेत.

शहरात 24 तर ग्रामीण (Nagpur Rural) मध्ये 42 असे जिल्ह्यात एकूण 66 ब्लॅक स्पॉट आहेत. या ब्लॅक स्पॉटमुळे गेल्या तीन वर्षात 1 हजार 746 नागरिकांचा मृत्यू झालाय.

देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे (Nagpur) आहेत. देशात रस्त्यांचं मोठं जाळं त्यांनी विणलंय. मात्र, त्यांच्याच जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट आणि त्यातून नागरिकांचे गेलेले जीव ही शोभणीय बाब नाही. त्यामुळे हे ब्लॅक स्पॉट दुरुस्त करुन नागरिकांचे जीव कसे वाचतील, या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT