Nagpur Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: सराफ दुकानात हातचलाखी करत सोन्याची कर्णफुले चोरली; उत्तरप्रदेशमधील दोघांना अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक तपास करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

संजय डाफ

Nagpur Crime News: उत्तर प्रदेशातून येऊन नागपुरातील सराफा दुकानात हातचलाखी करत सोन्याची कर्णफुले चोरणाऱ्या बंटी-बबली ला नागपूरच्या तहसील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सतीश सोनी व राणी देवी सोनी अशी या दोघांची नावे असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर (Nagpur) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून सराफ दुकानातून कर्णफुले चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपूरच्या इतवारी भागातील ही घटना आहे. परिसरातील टांगा स्टँड परिसरातील सावरकर ज्वेलर्समध्ये काही दिवसाआधी आरोपी सोन्याची कर्णफुले खरेदी करण्यासाठी आली होती.

दुकानदार त्यांना कर्णफुले दाखवत असता हात सफाई करून त्यांनी सहा ग्राम वजनाची दोन कर्णफुले लांबवली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. दुकानदाराने या प्रकाराची पोलीस तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक तपास करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Crime News)

आरोपी सतीश सोनी व राणी देवी सोनी हे दोघेही उत्तर प्रदेश मधील राहणारे असून ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Param Sundari vs Baaghi 4 : 'परम सुंदरी' की 'बागी 4' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? टायगर श्रॉफच्या चित्रपटाने 5व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

SCROLL FOR NEXT