Nagpur Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूर शहरात खळबळ! खेळताना ३ मुलं बेपत्ता; आज कारमध्ये आढळले मृतदेह, नेमकं काय घडलं?

Nagpur Crime News: मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे; मन सुन्न करणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

संजय डाफ

Nagpur News: नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरातील फारुक नगर टेका परिसरातील ३ मुलांचा गाडीमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ही तिनही मुले कालपासून बेपत्ता होती. अखेर त्यांचा मृतदेह आढळला असून या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर (Nagpur) पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परीसरातून शनिवारी सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना अचानक बेपत्ता झाली. त्या तिनही चिमुकल्यांचे मृतदेह आज आढळले आहेत. या मुलांचा वाहनात गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

कालपासून होती बेपत्ता....

या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे. शनिवारी सायंकाळी ही तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली तरीही मुले घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली. तसेच पोलिसांतही तक्रार केली.

कारमध्ये आढळले मृतदेह....

पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कँमेऱ्याचे तपासणे सुरु केले आहे. मुले बेपत्ता होऊन २४ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना मुलांना शोधता आले नाही. मुलांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी पुन्हा फारुखनगरात शोधणे सुरु केले. तीनही मुलांचे वय लक्षात घेता ते जास्त दूर गेले नसल्याचे पोलिसांना खात्री होती.

अखेर रात्री आठ वाजता एका वाहनात तीनही मुले बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT