Sangli Reliance Theft: सांगली रिलायन्स ज्वेल्स चोरी प्रकरणात मोठी अपडेट! ४ दरोडेखोरांची नावे समोर

Sangli Reliance Jewels Robbery Case Upate: हा दरोडा पूर्वनियोजित आणि तांत्रिक काळजी घेऊन टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.
Reliance Theft
Reliance TheftSaam Tv
Published On

Sangli Crime News: सांगलीतील रिलायन्स ज्वेलमधील दरोड्यात चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्व दरोडेखोर हैद्राबाद बिहार राज्यातील असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने लवकरच त्यांना अटक करू असा दावा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिला आहे. तसेच हा दरोडा पूर्वनियोजित आणि तांत्रिक काळजी घेऊन टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. (Crime IN Marathi)

Reliance Theft
Nagpur News: विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक: नितीन गडकरी

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील (Sangli) मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेल्स हे भव्य शोरूम गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. हे ज्वेलर्स रविवारी दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा टाकून लुटण्यात आले होते. या चोरीमध्ये दरोडेखोरांनी तब्बल 14 कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास केले होते.

या प्रकरणात आता महत्वाची अपडेट समोर आली असून दरोड्यातील चौघांची नावेही मिळाली आहेत. गणेश भद्रेवार (हैद्राबाद), प्रताप अशोकसिंग राणा (जिल्हा वैशाली बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिमबंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (वैशाली बिहार) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. (Latest Marathi News)

Reliance Theft
Sangli Crime News: राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येचा २४ तासात उलघडा! धक्कादायक कारण समोर; चौघांना अटक

दरम्यान, या दरोडेखोरांच्या शोधासाठी एक पथक त्या राज्यात तळ ठोकून असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने लवकरच या दरोडेखोरांना अटक करू असे पोलिस अधिक्षक तेली यांनी सांगितले आहे. तसेच स्थानिकांची मदत न घेता हा गुन्हा करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com