Crime Saam Tv
महाराष्ट्र

महिला IPS अधिकाऱ्याच्या घरातच चोरी; धक्काबुक्की करत मारहाण

नागपुरात चक्क एका आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय घरातच चोरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : खूप परिश्रम आणि खडतर मेहनत करुन पोलीस कर्मचारी, अधिकारी घडले जात असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस (Police) कायम अलर्ट राहत असतात. पण नागपुरात चक्क एका आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यामध्ये चोरी (Theft) झाली आहे. एवढेच नाही तर अधिकाऱ्याला धक्काबुक्की देखील केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खुद्द आयपीएस (IPS ) अधिकाऱ्याला स्वत:चं संरक्षण करता आले नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे देखील पहा-

नागपुरात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने तिच्या शासकीय बंगल्यामध्ये चोरी आणि त्यांच्यासोबत धक्काबुक्की करत मारहाण (Beating) झाल्याची तक्रार पोलिसात केली आहे. महिला आयपीएस अधिकारीच्या या तक्रारीनंतर नागपुरातील सदर पोलीस स्टेशनमध्ये चोरी आणि धमकी देऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी कमालीची गोपनीयता बाळगत असून अद्याप याप्रकरणी कोणाला देखील अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली आहे. संबंधित महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यात त्यांच्याच ओळखीच्या एका इसमाने त्यांच्या बरोबर गैरव्यवहार करत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच सुमारे 1 लाख रुपये रोख आणि संपत्तीचे काही दस्तावेज चोरुन नेले आहे, अशी तक्रार संबंधित महिला आयपीएस अधिकाऱ्याने दिली आहे.

या तक्रारीनंतर नागपूर पोलिस दलात खळबळ उडाली असून महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी त्यांच्याशी गैरव्यवहार आणि चोरी कशी काय होऊ शकते? असा प्रश्न सध्या चर्चा केली जात आहे. पोलीस त्यातही आयपीएस अधिकाऱ्याला स्वत:चं रक्षण करता आलं तर सामन्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असाही प्रश्न सध्या विचारला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT