महाराष्ट्र

धुळवडीच्या दिवशी नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतलं; आजीविरोधात पोलिसांत गुन्हा

nagpur shocking incident : नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतणाऱ्या आजीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Vishal Gangurde

आजीने नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना

धुळवडीच्या दिवशी रंग उडवला म्हणून संतापून आजीचे कृत्य

आजीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

पराग ढोबळे, साम टीव्ही

अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने स्वतःच्या चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात ओमच्या आईच्या तक्रारीवरून आजीच्या विरोधात कोराडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरात कोराडी परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र एकच संताप व्यक्त करण्यात येत होता. आत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतणाऱ्या आजीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आजीच्या संतापजनक कृत्याच्या विरोधात कडक कारवाईची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत होती. यानंतर जिल्हा बाल सरक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणी आईचा समुपदेशन केल्यानंतर बाल न्याय अधिनियम कलम ७५ अंतर्गत तसेच गंभीर दुखापत पोहचवल्याचा कलमन्वे कोराडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम हरीश वांगे असे जखमी बालकाचे नाव आहे. तर सिंधू ठाकरे या त्याच्या आईच्या आई म्हणजे ओमच्या आजीचे नाव आहे. या घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला मिळताच कोराडी पोलिसांना कळविण्यात आले होते. मुलगा आधी स्थानिक रुग्णालयात दाखल होता. मात्र उपचार अपुरे असल्याने नागपुरातील दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार ओम सुमारे 45 टक्के भाजला आहे. त्वचेच्या दोन थरांना इजा झाली आहे. त्याची प्रकृती सुधारत आहे. गरज पडल्यास वैदकीय अधिकारी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

तत्पूर्वी, आजीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT