Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : जेलमधून बाहेर येताच पुन्हा सुरु केली घरफोडी; मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

Nagpur News : अफरोज हा काही दिवसांपूर्वी जेल मधून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा घरफोडी आणि चोरीच्या करायला सुरुवात केली होती. तपासात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्या केल्याचं कबुली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर तुरुंगवास भोगावा लागला. यानंतर तुरुंगातून काही दिवसांपूर्वी सुटका झाली. मात्र जेलमधून बाहेर पडताच पुन्हा घरफोडी करण्यास सुरवात केली. चोरीच्या गुन्ह्यात पुन्हा नंदनवन पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. यात शहरातील  नंदनवन परिसरात झालेल्या घरफोडी मध्ये सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी संबंधितांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. याची दखल घेत पोलिसांनी त्याचा तपास करत असताना हा आरोपी नंदनवन पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी आठ लाखापैकी चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा चोरी 

दरम्यान कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसानी अटक केली आहे. अफरोज शमशाद अन्सारी अस अटकेतील आरोपीच नाव आहे. विशेष म्हणजे अफरोज हा काही दिवसांपूर्वी जेल मधून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा घरफोडी आणि चोरीच्या करायला सुरुवात केली होती. तपासात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्या केल्याचं कबुली दिली. पोलीस आता त्याचा सुद्धा तपास करून मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे.

दोघे दुचाकी चोर ताब्यात 
जालन्यात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केल आहे. त्यांच्या ताब्यातून ५ लाख २० हजारांच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. गीतू राजपूत आणि निलेश बनसोडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सदर बाजार पोलीस एका गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांनी एका गुन्ह्यातील दुचाकी चोराला ताब्यात घेतलं. त्याचा अजून एक साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT