Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : वर्चस्वाच्या लढाईतून एकाची हत्या; नागपूर शहरातील घटना, तिघांना अटक

Nagpur News : मृत कार्तिक आणि घटनेतील तिघे संशयित आरोपी हे सोबत दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पिल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी क्वार्टर परिसरात वर्चस्वातून लढाईतून एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात उना वाद उकरून तीन जणांनी मिळून हत्या केली आहे. या प्रकरणी सक्करदारा पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांकडून तपास सुरु असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  

नागपूर शहरातील सक्करदारा पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या घटनेत कार्तिक चौबे असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी रोशन गायकवाड, सत्यशील गजभिये, करण हाडके या तिघांना ताब्यात घेतले आहे. महत्वाचं म्हणजे मृत कार्तिक आणि घटनेतील तिघे संशयित आरोपी हे सोबत दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पिल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. 

वर्चस्वाची लढाई 

दारू पिऊन उद्भवलेल्या वादात तिघांनी मिळून कार्तिक चौबे याच्यावर शस्त्राने वार केले. यात कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. आरोपी आणि मृतक हे एकमेकांना ओळखणारे होते. मात्र त्यांच्यात परिसरातील वर्चस्वाची लढाई सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यातूनच वाद निर्माण होऊन हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. 

तीन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला 
कार्तिक चौबे ह्याने २०२० मध्ये साथीदाराच्या मदतीने एकाचा खून केला होता. तीन महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. यात काही दिवसांपूर्वी रोशनला मारहाण केली होती. हाच राग रोशनच्या मनात होता. यात वादातून त्याने रोशनच्या डोक्यावर दारूची बॉटल मारत आणि छातीवर सपासप वार केले. यात रुग्णलायत नेले असताना कार्तिकाला डॉक्टरानी मृत घोषित केले. घटनेचा तपस पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT