Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : इंजिनिअर तरुणाला जुगाराचे व्यसन; कर्जबाजारी झाल्याने नोकरी सोडून अवलंबला वेगळा मार्ग, नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात

Nagpur News : आशिष याने एएमटेकपर्यंत शिक्षण घेतलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिहानमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत काम केले. मात्र जुगार खेळण्याची लत लागली. यातून तो कर्जबाजारी झाला त्यानंतर चोरी करायला लागला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : उच्च शिक्षित असलेला इंजिनियर तरुण चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. मात्र या तरुणाला जुगाराचे व्यसन लागले आणि संपूर्ण आयुष्य बदलले. जुगारात पैसे हरल्याने कर्जबाजारी झाला. यातून नोकरी सोडली आणि चोऱ्या करण्यास सुरवात केली. या चोरी करणाऱ्या तरुणाला नागपूरच्या धंतोली पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आशिष रेड्डीमल्ला असे या संशयित आरोपीचे नाव आहे. चंद्रपूर मधील रयतवारी कॉलनीत तो वास्तव्याला होता. दरम्यान त्याचे वडील सुद्धा उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष याने एएमटेकपर्यंत शिक्षण घेतलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिहानमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत काम केले. मात्र जुगार खेळण्याची लत लागली. यातून तो कर्जबाजारी झाला त्यानंतर चोरी करायला लागल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नोकरी सोडून चोरी करण्यास सुरवात 

सॉफ्टवेअर कंपनीत चांगली नोकरी करत असताना २०२३ मध्ये त्याने नोकरी सोडून चोऱ्या करायला सुरवात केली. तो सध्या नागपुरात वास्तव्यास आला होता. तसेच नागपुरात चोऱ्या करत होता. बंद घर दिसल्यास तो चोरी करायचा. चोरीच्या तक्रारींवरून पोलिसांनी तपास करत जवळपास १२० सीसीटीव्ही तपासल्यातर मिळून आलेल्या चेहऱ्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. यानंतर त्याला चंद्रपुरातून अटक करण्यात आली आहे.

पाच ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड 

नागपुरातील छत्रपती चौकाच्या आसपास असलेल्या परिसरात तो चोऱ्या करून जुगार खेळायचा. आतापर्यंत आशिषने पाच ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात परदेशी चलन सुद्धा मिळून आले आहे. या आधी सुद्धा त्याला दोन वेळा पोलिसांनी अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra Live News Update: महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणारी व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT