Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नात्‍यातीलच मुलीवर प्रेम करणे पडले महागात; प्रेम प्रकरणातून हल्‍ला; युवकाची मृत्‍यूशी झूंज

नात्‍यातीलच मुलीवर प्रेम करणे पडले महागात; प्रेम प्रकरणातून हल्‍ला; युवकाची मृत्‍यूशी झूंज

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रेम प्रकरणातून एकावर चाकूने जबरी हल्ला झाला. त्यात तो गंभीररित्या (Nagpur News) जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तो गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोन आरोपींना अटक केली. परिसरात चांगलीच खडबड उडाली आहे. (Letest Marathi News)

नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील वनदेवीनगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये प्रेम प्रकरणातून एका युवकावर दोघांनी चाकू हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. तो रुग्णालयामध्ये मृत्यूची झुंज देत आहे. जखमी युवकाचे ज्या युवतीसोबत प्रेम संबंध होते; तो तिच्या नात्यातीलच असून आरोपींना त्यांच्या प्रेम संबंधावर आक्षेप होता.

मुलीपासून दूर राहण्याची दिली होती धमकी

याआधी सुद्धा त्या मुलीपासून दूर राहण्याची धमकी आरोपींनी दिली होती. मात्र यांचे प्रेम संबंध सुरूच असल्याने आरोपींनी त्याच्यावर भरदिवसा वस्तीमध्ये चाकू हल्ला (Crime News) केला. त्यामुळे परिसरात चांगलीच खडबड उडाली असून पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. तर आरोपींना बेड्या ठोकून अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT