Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: वाहन पार्किंगवरून वाद; तरुणाची हत्या, दोन जखमी

वाहन पार्किंगवरून वाद; तरुणाची हत्या, दोन जखमी

मंगेश मोहिते

नागपूर : वाहन पार्किंगच्या वादातून नागपूरच्या विनोबा भावे नगरात एका तरुणाची हत्या करण्यात आली. तर दोन जण जखमी झाले आहेत. या महिन्यातील ही आठवी हत्या (Crime News) ठरली. यशोधरानगर पोलिसांनी (Police) या प्रकरणी गुन्हे दाखल करत तपास सुरू केला. (Breaking Marathi News)

नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत बॅटरीवर चालणारी ऑटो रिक्षा पार्क करण्याच्या वादातून हाणामारी झाली. त्यात एकाच मृत्यू झाला. योगेश धामने असे मृत युवकाचे नाव असून तो पेंटिंगचे काम करत होता. मोनू बन्सीलाल रायतदार, सुदामा बन्सीलाल रायतदार आणि नंदलाल रायतदार अशी आरोपींची नावे आहेत. रामभाऊ शाह व योगेश यांचा आरोपींशी घरासमोर वाहन ठेवण्यावरून वाद झाला होता.

रात्री पुन्‍हा वाद उद्‌भवला

रात्री जेवण झाल्यावर योगेश व रामभाऊ घराबाहेर गप्पा मारत होते. यावेळी योगेश व मोनूमध्ये परत वाद झाला. त्यातून रामभाऊने मोनूला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून सुदामा व नंदलाल हे घराबाहेर आले. त्यांनी योगेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी चाकू व रॉडने योगेशवर वार केले. यात योगेश रक्तबंबाळ झाला व निपचित पडला. मारहाणीत रामभाऊ शाहू व मोनू हे देखील जखमी झाले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT