Nagpur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नागपुरात चाललंय काय? 24 तासांत वेगवेगळ्या ठिकाणी 4 जणांच्या हत्या, शहरामध्ये खळबळ

4 people Killed in Nagpur: या तिन्ही प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) सुरु आहे.

Priya More

संजय डाफ, नागपूर

Nagpur News: नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या (Nagpur Crime) घटना वाढत चालल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची हत्या झाल्याने नागपूर हादलले आहेत. पैशांच्या वादातून दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. दुसऱ्या घटनेत भावाने बहिणी हत्या केली. तर तिसऱ्या घटनेमध्ये अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीची हत्या केली. या तीन घटनांमुळे नागपूर हादरले आहे. या तिन्ही प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. उधारीच्या पैशाच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली. दोन्ही व्यापाऱ्यांचे अपहरण करून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर दोघांचेही मृतदेह पोत्यामध्ये भरून नागपूर जिल्ह्यातील तळेगाव येथील नदीमध्ये फेकून देण्यात आले होते.

हे दोन्ही व्यापारी मिसिंग असल्याची तक्रारी नागपूरच्या बर्डी पोलीस ठाणे आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सट्ट्यामधून उधारी आणि नंतर उधारीचे पैसे देणे शक्य न झाल्याच्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे नागपूरात खळबळ उडाली आहे.

दुसरी घटना, नागपूरच्या नंदनवन परिसरामध्ये घडली आहे. याठिकाणी सख्ख्या भावानेच आपल्या मनोरुग्ण बहिणीची हत्या केली. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तर, तिसरी घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आङे. मोतीबाग परिसरात एका अल्पवयीन मुलाने कचरा वेचणाऱ्या व्यक्तीची हत्या केली आहे. या मुलाने ४० वर्षांच्या व्यक्तीची तलवारीने १५ वेळा वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेप्रकरमी जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही घटनांमुळे नागपूर हादरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT