नागपूरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून Saam Tv
महाराष्ट्र

नागपूरमधील भयानक घटना! कुख्यात गुंडाचा दगडाने ठेचून खून

या हत्याकांडातील पाचही आरोपींना जरीपटका पोलिसांच्या ताब्यात

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री एक थरारक घटना घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका कुख्यात गुंड्याला घेरून पाच जणांच्या टोळीने त्याची दगडाने ठेचून खून केला. फ्रँक अन्थोनी असे खून झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. फ्रँक अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगरात राहत होता. फ्रँकवर जरीपटका आणि गिट्टीखदान पोलिस ठाण्यात हत्याकांडाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

हे देखील पहा -

मंगळवारी रात्री ७.३० च्या सुमारास पत्नी आणि दोन मुलांना घेऊन तो मार्टीननगरातील सासुरवाडीत आला होता. तेथून तो खोब्रागडे चौकाजवळ पोहोचला. याठिकाणी त्याला काही जण वाद घालताना दिसले आणि तो त्यांच्याकडे बघू लागला. आरोपींचे त्याच्याकडे लक्ष गेल्याने त्यांनी ‘क्या देख रहा बे’ असे म्हटले. यावरून फ्रँकमधील गुन्हेगार जागा झाला. ‘मुझे पहचानता नही क्या’, असे विचारत फ्रँकने आरोपींना शिवीगाळ केली.

त्यामुळे वाद आणखी वाढला दारूच्या नशेत टून्न असलेल्यापाच जणांच्या टोळीने फ्रँकला घेरून त्याची दगडाने ठेचून भीषण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय देवकते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता संशयीत आरोपी विक्की उर्फ सतीश तायवाडे, क्रिष्टोफर डेनियल, सोबियल डेनियल, सॅमिन पिटर आणि आकाश वाघाडे या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

तुम्ही कूलर वापरताय? सावधान ! कूलरनं घेतला चिमुकल्याचा बळी

SCROLL FOR NEXT