Nagpur Police Rescue 16-Year-Old Girl After Alleged Instagram-Linked Abuse AI
महाराष्ट्र

Shocking : नागपूर हादरले! १६ वर्षीय मुलीला धमकावले, ओलीस ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

Nagpur Crime News : नागपुरात इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर १६ वर्षीय मुलीला धमकावून ओलीस ठेवल्याचा आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली.

Alisha Khedekar

  • नागपूरमध्ये धक्कादायक घटना

  • १६ वर्षीय मुलीला धमकावून मारहाण करून लैंगिक अत्याचार

  • १९ वर्षीय तरुण अटकेत

  • पोलीस तपास सुरु

नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून,तिला धमकावून आणि मानसिक दबावाखाली ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय निर्भय पखारे याला अटक केली आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षिततेबाबत आणि अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. आरोपीने ‘आकाश मेहरा’ या नावाने बनावट अकाउंट तयार करून तिच्याशी मैत्री केली. त्यांनतर दोघांमध्ये संवाद वाढला. याचाच गैरफायदा घेत तरुणाने मुलीचे काही खासगी फोटो मिळवले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकाराला ‘डिजिटल अरेस्ट’ असे म्हटले आहे.

धमक्यांमुळे घाबरलेली पीडित मुलगी आरोपीच्या संपर्कात राहिली. त्यानंतर तिला नागपूरच्या दिघोरी परिसरातील भाड्याच्या खोलीत ओलीस ठेवण्यात आले. तेथे आरोपीने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तिने नकार दिल्यास तिला बेल्टने मारहाण करून चाकूने तिच्या शरीरावर २० वेळा वार केल्याचेही तपासात समोर आले आहे. यात वापरलेले पट्टे आणि बेल्ट नागपूरमधील दोन पेट शॉपमधून खरेदी केल्याचे पोलिसांना आढळले.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर २ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी तिचे ठिकाण शोधून काढले. ३ ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून मुलीची सुटका केली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात घरमालकाचीही चौकशी सुरू आहे. भाडेकरूची माहिती पोलिसांना न दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षिततेबाबत आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra government : तुकाराम मुंढेंनी मांडला संपूर्ण प्लॅन अन् शिंदेंनी क्षणात दिला आदेश! FDA च्या बैठकीतील 'तो' मोठा निर्णय आला समोर

ना कोणता ब्रश, ना कोणती टूथपेस्ट; फक्त हा एक उपाय करून पाहा, दात मोत्यासारखे चमकतील

Maharashtra News Live Update : जळगाव- सिन्नरकडून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची जोरदार धडक; 12 जखमी

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्या ७ राशींसाठी भाग्याची, बक्कळ पैसा मिळणार; तुमची रास यात आहे का?

Smartphone Explode : पावसाळ्यात स्मार्टफोनचा कधीही होऊ शकतो स्फोट, चुकूनही करू नका 'ही' १ चूक

SCROLL FOR NEXT