Nagpur Shocking Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Shocking : अंत्यविधीला ७५००० रुपये, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला VIDEO; लग्नाच्या वाढदिवशी नवरा-बायकोने एकाचवेळी मृत्यूला कवटाळलं

Nagpur Shocking News : लग्नाच्या वाढदिवशी नवरा बायकोने एकाचवेळी मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली आहे. अंत्यविधीसाठी ७५००० रुपये, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत या जोडप्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

नागपूर : नागपुरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपुरात लग्नाच्या वाढदिवशी नवरा बायकोने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे या नवरा-बायकोने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. नागपूरच्या मार्टीननगरातील या महिलने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवला. तसेच एक नोट देखील लिहिली. या संपूर्ण घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान करून आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या जोडप्याने आत्महत्येपूर्वी नोट देखील लिहिली.

नागपुरातील या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता. पती जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप असे दोघांचे नाव आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दोघांनी अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले असल्याचं सुद्धा चिठ्ठीत नमूद करत माफी मागितली.

पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितलं की, 'आम्हाला मार्टिननगरमध्ये पती-पत्नीने साडे सात वाजता ही माहिती हाती आली. त्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पती ५४ वर्षांचे आहेत. तर पत्नी ४५ वर्षांचे आहेत. पत्नीही लग्नाच्या जोड्यात होती. या दोघांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यांनी स्टेटसवरही व्हिडिओ पोस्ट केला होता. महिलेचा पती चार-पाच वर्षांपासून बेरोजगार होते. त्यांना मुलबाळ नव्हतं. ते शेफ होते. गेल्या काही दिवसांपासून दोघे आर्थिक परिस्थिती कंटाळले होते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT