Nagpur News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: बांधकाम सुरू असताना लोखंडी सळई निसटली अन् थेट चिमुकल्याच्या डोक्यात शिरली; नागपुरातील धक्कादायक घटना

Nagpur Latest News: डॅाक्टरांनी शस्रक्रिया करुन सळई बाहेर काढली असून मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

संजय डाफ

Nagpur News: कुटूंबासोबत गाडीवरुन जात असताना बांधकामावरील सळई पडून थेट अल्पवयीन मुलाच्या डोक्यात शिरली. नागपूर शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॅाक्टरांनी शस्रक्रिया करुन सळई बाहेर काढली असून मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३ वर्षीय मुलाच्या डोक्यात सळई शिरल्याची घटना नागपूर (Nagpur) शहरातील पारडी परिसरात घडली. सात दिवसांपूर्वी तो आपल्या कुटुंबासोबत दुचाकीवर जात होता. यावेळी उड्डाणपुलाच्या बांधकामावरील सळई पडून थेट चिमुकल्याच्या डोक्यात शिरली.

घटनेनंतर चिमुकल्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॅाक्टरांनी शस्रक्रिया करुन डोक्यातील सळई बाहेर काढली असून सध्या या मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी संंबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे नेते गुड्डू रहांगडाले यांच्याकडून मुलाच्या कुटूंबियांना आर्थिक मदतही करण्यात आली असून कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT