Nagpur Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये राडा, बेदम मारहाणीत १ जखमी

Nagpur Latest News: कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस स्टेशन मध्ये आरोपी कैद्यांविरुद्ध विविध कलमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १० ऑगस्ट २०२४

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये जेवण वाढण्यावरुन दोन कैद्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यानंतर दोन्ही कौद्यांमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत.

सुमित मून असे जखमी कैद्याचे नाव असून त्याच्याकडे तुरुंगात जेवण वाटपाची जबाबदारी आहे. ७ ऑगस्टला त्याचे आरोपी कैदी सिद्धेश घाडगे आणि मनोज वाघमारे यांच्याशी भाजी वाढण्यावरुन वाद झाले.

याच वादातून 7 ऑगस्टला जर्मनच्या भांड्याने सुमितच्या डोक्यावर वार केला. या मारहाणीत सुमित मून गंभीर जखमी झाला. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कैद्यांविरुद्ध विविध कलमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही नागपूर तसेच पुणे आणि कोल्हापूर कारागृहामध्ये कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना समोक आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT