Nagpur Police Station Saam
महाराष्ट्र

Nagpur News: शाळेत खेळताना पडला, दवाखान्यात न नेता शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारलं; नागपुरमधील धक्कादायक घटना

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २८ सप्टेंबर

Teacher Beat Student: शाळेमध्ये खेळताना पडला म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशच्या हद्दीत इन्फन्ट जिजास इंग्लिश स्कुलमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी प्राचार्य आणि क्रीडा शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरात वाडी पोलीस स्टेशच्या हद्दीत इन्फन्ट जिजास इंग्लिश स्कुलमधील चौथीतील विद्यार्थ्याला मारहाण केल्यामुळे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्फन्ट जिजास इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकणारा दहा वर्षाचा मुलगा शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करत होता. सुरुवातीला त्याच्या पालकांनी विद्यार्थ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर मात्र 24 सप्टेंबरला मुलाला डोक्याला दुखापत झाली होती आणि हात सुजलेला होता. त्यावेळी आईने विचारणा केली असता शाळेत खेळताना पडल्यानं शिक्षकांन मारहाण केल्याचा सांगितले. शाळेमध्ये खेळत असताना पडल्याने त्याला दवाखान्यात न नेता क्रीडा शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याचे त्या मुलांनी सांगितले.

तसेच याबाबत पालकांनीही कोणतीही कल्पना दिली गेली नाही. दरम्यान, या घटनेने पालकांनी संताप व्यक्त करत पोलिसात धाव घेतली आहे. पालकांच्या तक्रारीनुसार शाळेचे क्रीडा शिक्षक आणि प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सध्या सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

Maharashtra News Live Updates:विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट घड्याळ चिन्हबाबत निर्णय देणार ?

Bigg Boss Marathi Suraj Chavan: सुरजचं लग्न कधी होणार? बिग बॉसच्या घरातच ठरणार कार्यक्रम; शरद उपाध्याय यांनी केली भविष्यवाणी

Traveling Tips: विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होतो, तर करा 'हे' उपाय

Rules Change : १ ऑक्टोबरपासून १० गोष्टींमध्ये बदल; खिशाला कात्री लागण्याआधी वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT