Nagpur Blast in explosive Factory Latest update Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Latest News : 'घटनेची चौकशी तीन स्तरांवर होणार', नागपूर स्फोट दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

Blast in explosive Factory in Nagpur : नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.

साम टिव्ही ब्युरो

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur News :

नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटना आणि मदतकार्याची माहिती घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''ही दुर्दैवी घटना आहे. प्रचंड मोठा स्फोट झाला असून 6 महिला आणि 3 पुरुषांचा मृत्यू आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''घटनेची चौकशी तीन स्तरांवर होईल. पेट्रोलियम एक्सप्लोसिव्ह कडून बीडीडीएसकडून आणि पोलिसांकडून तीन वेगवेगळ्या चौकशी केल्या जाईल.'' मुख्यमंत्री म्हणाले, मृतदेह उद्यापर्यंत नातेवाईकांना सुपूर्त केले जाईल. घटनेबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षण दिलं होतं की नाही, हे सर्व चौकशीत समोर येईल. (Latest Marathi News)

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याठिकाणी येऊन पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना मदतकार्य वेगाने पूर्ण करण्यात यावे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करावे, असे निर्देश दिले. उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT