Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : वडील कामावर, आई घरकामात व्यस्त; खेळताना बादलीत पडली, १ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकोडी येथे ११ महिन्यांच्या चिमुकलीचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरमध्ये ११ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

  • पाण्याच्या बादलीत पडल्याने घटना घडली

  • काही क्षणांच्या दुर्लक्षामुळे अपघात

  • लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Savner Tragedy News नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकोडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळता खेळता एका ११ महिन्यांच्या चिमुकलीचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मृत मुलीचे नाव संध्या मंजीत टेकाम असे असून, तिचे वडील मंजीत टेकाम हे वाकोडी येथील ‘वूड्स प्लाय’ कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंजीत कामावर गेले होते, तर संध्या घराच्या अंगणात खेळत होती. घरातील इतर सदस्य आपापल्या कामात गुंतलेले असताना काही क्षणांसाठी चिमुकलीकडे दुर्लक्ष झाले.

याच वेळी खेळता खेळता संध्या पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेली. बादलीला धरून उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला आणि ती डोक्याच्या भारावर थेट बादलीत पडली. ही घटना इतक्या झटपट घडली की कोणालाही त्याची कल्पना आली नाही. काही वेळाने संध्या दिसत नसल्याचे लक्षात येताच तिच्या आईने घाबरून शोधाशोध सुरू केली. अखेर ती पाण्याच्या बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळली.

कुटुंबीयांनी तातडीने तिला सावनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे टेकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वाकोडी परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, लहान मुलांच्या बाबतीत क्षणभराचे दुर्लक्षही किती घातक ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! फिटमेंट फॅक्टरनुसार मिळू शकतो ₹14.10 लाखांपर्यंत एरियर, महत्त्वाची अपडेट समोर

महायुतीत पुन्हा जुंपली! भाजपने बोगस मतदानाने सत्ता मिळवली, शिंदेंच्या मंत्र्यांचा खळबळजनक आरोप, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सरकारची हालचाल; प्रसाद लाड यांच्याशी गंगाधर काळकुटेंची फोनवरून चर्चा

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन प्रकरण CBI कडे; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Egg freezing: करिअर की मातृत्व? नोकरदार महिलांचा ‘एग्ज फ्रिजींग’कडे वाढता कल; भविष्यातील आईपणासाठी नवा पर्याय

SCROLL FOR NEXT